खवल्या मांजराची तस्करी


गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात ३२ लाख रुपये किंमत असलेल्या खवल्या मांजराची शिकार करुन तस्करी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

प्राप्त माहितीनुसार तस्करांनी गोडलवाही येथील दोन लोकांकडून कमी किंमतीत सदर खवल्या मांजर विकत घेऊन ते बाहेरच्या मोठ्या तस्करांना ३२ लाख रुपये किंमतीत विकण्याचा सौदा केला होता. रविवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान भाकरोंडी या गावाकडे विक्रीसाठी नेत असताना वडसा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तस्करांना रंगेहात पकडले. यात काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर तीन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींमध्ये गोडलवाही, भाकरोंडी, सालेभट्टी व धानोऱ्यातील लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यात एक शिक्षक व एका शिक्षकाच्या मुलाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान वनविभागाची एक चमू आरोपींच्या शोधात रवाना झाली आहे.

Recommended read: चितळाची शिकार प्रकरणी तिघांना अटक राजुरा वनपरिक्षेत्रातील घटना

उल्लेखनीय आहे की काळी मांजर, खवल्या मांजर यांसारख्या प्राण्यांचा वापर तंत्र- मंत्र विद्या, गुप्तधन शोधणे व ते बाहेर काढूणे अशा कामात केला जातो तर याच्या खवल्यांमध्ये औषधीय गुणधर्म असल्यामुळे आणी शोभेच्या वस्तू, अलंकार तयार केले जातात. याच्या चामडी पासुन कॅन्सरचे औषध तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. खवल्या मांजराला एक लाख ते एक कोटी एवढी किंमत प्राप्त होऊ शकते. त्यामुळे भारतात खवल्या मांजराची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे दिसून येते.

One thought on “खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक आरोपीमध्ये शिक्षक व शिक्षकांचा मुलगा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!